काश्मीरचं वर्णन एका शब्दात करायला सांगितलं तर तो शब्द असेल- 'ब्यूटिफुल!' रादर
काश्मीरचा निसर्ग आणि काश्मिरी पोरी बघितलं की 'सौंदर्य' या शब्दाचा खरा अर्थ कळतो!
फक्त फरक एवढाच की तिथला निसर्ग जेवढा रौद्र भासतो तितकंच कश्मिरी मुलींच सौंदर्य
हे संयत वाटतं.
मूवीजमध्ये 'कश्मीर की कली' वगैरे शब्द ऐकले असतात. नशिब चांगलं असेल तर कॉलेजमध्ये एखादी 'कश्मिरी ब्यूटी' पाहून 'दिल' तिच्यासाठी वेडं वगैरे पण झालेलं असू शकतं. हे अनुभव असतानाही काश्मीरमध्ये गेल्यावर पहिल्या दिवसापासूनच तिथल्या पोरी बघून वेडं व्हायला होतं.
आपल्या इथे सौंदर्याचं पहिलं परिमाण असलेला 'गोरेपणा' मुक्त हस्ते उधळलेला! पोरीच काय, आठवडाभरात अपवादाला देखील मी काळा सोडाच सावळा काश्मिरी माणूस देखिल बघितला नाही. अर्थात गोर्या चेहर्यावर लाल महिरपी ओठ नी काळे डोळे जास्तच ऊठून दिसतात. आणि जवळपास सगळ्याच पोरींचे लांबसडक केस म्हणजे सोने पे सुहागा! आणि हे सगळं फिक पडावं असे गोबरे गुलाबी गाल! माझा एक मित्र उत्स्फूर्तपणे बोलला होता "साला, आपल्या इथे पोरी या गुलाबी गालांसाठी किती मेकअप करतात!पण कितीही चांगला मेकअपमन असला तरी इथल्या पोरींची गाल जेवढे नॅचरली गुलाबी असतात त्याच्या आस पासही तो पोचू शकत नाही!"
पूंछ सारखा बॉर्डरवरचा भाग राहू देत पण राजधानी असलेल्या जम्मू सिटीमध्ये कॉलेज रोडवर फिरतानाही ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलीनी घातलेले पूर्ण अंग झापणारे कपडे. जीन्स-टॉप असेल तरी तो देखील या सगळ्या वर्णनाला सूट होईल असाच! आणि अंगभर कपडे म्हणजे फॅशन नाही असं देखील मुळीच नाही. म्हणजे बहुतेक जणींचाच्या पंजाबी ड्रेसचा पॅटर्न लयीच भन्नाट असतो. सुरेख आणि नाजूक नक्षीकाम केलेले ते ड्रेस इथल्या मुलींना अगदीच शोभून दिसतात रादर त्यांचं सौंदर्य अधिक खुलवताता! हिंदू असो वा मुस्लीम, प्रत्येकीनी डोक्यावर ओढणी घेतलेली. बुरखा देखील बर्यापैकी कॉमन. पण 'बच्चनगिरीचा' आरोप स्वीकारूनही सांगतो की बुरख्यामधून किंवा तोंडावर घेतलेल्या ओढणी किंवा स्कार्फमधून दिसणारी आयलाईनही तेवढीच सुंदर दिसते.
पण खर सांगायच तर इथल्या पोरींच्या सौंदर्यात वेगळीच जादू आहे. नाजूकपणा आहे. आवाहन तर अजिबातच नाही. संयत सौंदर्य या आजपर्यंत केवळ पुस्तकात वाचलेल्या शब्दाचा अर्थ इथे आल्यावर कळतो. अगदी काश्मीर बाहेरून आलेल्या मुलाच्या तोंडूनही 'सेक्सी' ही कमेन्ट ऐकायला मिळत नाही. 'ऍडमिरेशन ऑफ ब्यूटी' हा आपल्या इथे रेअर होत चाललेला प्रकार तिथे प्रकर्षानी अनुभवायला मिळाला.